पूर्वानुभवाच्या
किंवा पूर्वज्ञानाच्या आधारे जेव्हा व्यक्ति नविन संकल्पनांची , संबोधांची रचना करते
तेव्हा त्यातून अध्ययन घडते यास ज्ञानरचनावाद
म्हणतात
वैशिष्ट्ये :–
1घोकंपट्टीपासून
सुटका :- आकलन करून समजुन अभ्यास करता येतो
2शाळेबाहेरचे जग
आणि शाळेतील शिकणे यांची सांगड घालता येते
3अध्ययन
कौशल्यांचा विकास :- श्रवण, भाषण, वाचन, लेखन ,संभाषण , अभिव्यक्ति या कौशल्याचा
विकास करणे सोपे होत.
4नविन माहिती
पूर्वज्ञानाशी जुळणारी असेल तर पूर्वीच्या ज्ञानात भर पड़ते .
5आंतरक्रियेमुळे
ज्ञाननिर्मितीला फायदा होतो.
पाठ शिकवताना खालील कृती अवश्य करून घ्याव्यात….
1 पाठ एक दिवस आधी वाचुन येण्यास सांगा
2पाठ मधील चित्र
दाखवून मुलांचे गट करून चर्चा घडवून आणा.
3झालेली चर्चा
प्रत्येक गटातील मुलालासांगण्याची संधी दया .
4गटात चित्रावर
आधारित पाच सहा ओळी माहिती लिहिण्यास 📝 सांगा
5प्रत्येक गटातील मुलाला माहिती वाचण्यास सांगा
6पाठाचा आशय
स्पष्ट करून सांगा.चर्चा घडवून आणा .
7योग्य तेथे
साहित्याचा वापर करा .
8नविन शब्दाचा
वाक्यात उपयोग करून घ्या
9संवादात्मक पाठ
मुलांना पात्र देवून नाटयीकरणाद्वारे सादर करून घ्या
10 कविता साभिनय सादर करून घ्या .
चला ज्ञानरचनावादी होऊया
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवूया!
ज्ञानरचनावादामध्ये शालेय मंत्रिमंडळाचे स्थान
रचनावादी शिक्षण पध्दतीची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक शिक्षक – विद्यार्थी गुणोत्तर
प्रमाण खुपच व्यस्त आहे. आपल्या अनेक वाड्या – वस्त्यांमधील शिक्षकांना
3-4वर्ग सांभाळत प्रशासनाचा गाडि हाकावा
लागतो. अशा वेळी “विद्यार्थी संसद / शाळा मंत्रीमंडळ ” महत्त्वाची भूमिका
बजावते. याचे काही प्रातिनिधीक फायदे पाहूयात.
रचनावादी उपक्रमासाठी
वेळेचे नियोजन
ज्ञानरचनावाद शाळेत अंमलात आणताना आपणास खुप अडचणी येतात. सर्वात मुख्य अडचण
म्हणजे वेळेची! आपण रचनावादासाठी इतर साहित्य, उपक्रम नियोजन यात गुंतून
जातो व मुलांना रचनावादी बनविण्यासाठी वेळ कमी पडतो. सोबत हे सर्व उपक्रम आपल्या
पाठ्यक्रमाचा भाग नसल्याने आपणास पाठ्यक्रमही पुर्ण करण्याची कसरत करावी लागते.
त्यातच जर शाळेमध्ये विविध माहितीचे टप्पे किंवा अहवाल आले कि मग आपण पुरते हताश
होतो. व यामूळे कधी – कधी आपला भ्रमनिराश पण होतो.
यावर उपाय म्हणून व आपणास विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात “शाळा मंत्रीमंडळ” खुप उपयोगी येते.
मुलांच्या कल्पकतेला वाव
मी बरेच वेळी असे पाहिले आहे की “ज्ञानरचनावाद” म्हटले की शिक्षक
स्वतःच्या कल्पक बुध्दीला ताण देऊन विविध रेडीमेड उपक्रम मुलांसमोर ठेवतात व मुले
ते पुर्ण करण्यात गुंतून जातात!
मात्र यात मुलांच्या सृजनशिलतेला आव्हान देणारे, कल्पनाशक्तीला चालना
देणारे उपक्रम विद्यार्थ्यांनीच स्वतः तयार करावेत नव्हे त्यांनीच पुढाकार घेऊन
राबवावेत अशी अपेक्षा असते. व शिक्षक यात केवळ एका निरीक्षकाची भूमिका बजावतात!
आणि यासाठी “शाळा मंत्रिमंडळ” एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देते.
मुलांच्या सुप्त गुणांचा विकासासाठी सर्वोत्तम
मुलांच्या सुप्त गुणांच्या विकासासाठी आपण वेगवेगळे स्वतंत्र उपक्रम राबवतो.
परंतु “शाळा मंत्रिमंडळ” हे यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देते. यातून खालील
गुणांचा विकास होतो.
1. निर्णय क्षमता
2. सहकार्याची भावना
3. पुढाकार घेऊन कार्य करणे.
4. जबाबदारीची जाणीव
5. ‘स्व’ चा विकास
6. नेतृत्व गुण
7. कार्यक्रम नियोजन
8. वक्तृत्व कौशल्य
9. परस्पर सहसंबंध
10. दुसऱ्याच्या मताचा आदर
घोषवाक्यातून ज्ञानरचनावाद
मित्रांनो, सध्या शालेय प्राथमिक शिक्षणात ज्ञानरचनावाद हा
शब्द परवलीचा झाला आहे . जिकडेतीकडे शैक्षणिक संकुला संकुलातून ज्ञानरचनावादाची
किलबिल कानी पडत आहे . ज्ञानरचनावादाविषयी अनभिज्ञ असणारे शिक्षक अध्यापन निरक्षर
ठरतात की काय अशी परिस्थिती सर्वत्र वेगाने निर्माण होते आहे . संपूर्ण अध्ययन -
अध्यापन प्रणालीच ज्ञानरचनावादाच्या आसाभोवती फिरते आहे . ज्ञानरचनावादाचं बोट
धरुन चालणाऱ्या शाळा , बीट महाराष्ट्राच्या
शैक्षणिक पटलावर उठून दिसत आहेत . म्हणून अनेकजन शब्द , विचार . कृतीतून आपापल्या परीने ज्ञानरचनावाद
चितारत आहेत . मी ही मला समजलेला ज्ञानरचनावाद घोषवाक्यातून टिपण्याचा प्रयत्न इथे
करतो आहे .................................................................
१ ] ज्ञानरचनावादी वर्ग माझा ,
मैदानाशी जिंके
पैजा !
२ ] शिक्षणाची
संजीवनी ,
क्रीडा कृती गाणी
!
३ ] ज्ञानरचनावादाचे लक्षण ,
स्वगतीने शिक्षण
!
४ ]
ज्ञानरचनावादाशी जोडू नाते ,
गुणवत्तेचे फिरवू
पाते !
५ ]
ज्ञानरचनावादाची हमी ,
गळती करी कमी !
६] ज्ञानरचनावादाचा मूलमंत्र ,
विकसू स्वतःचे
तंत्र !
७ ]
ज्ञानरचनावादाच्या गर्भात ,
बालकांची भरभराट
!
८] ज्ञानरचनावादी होऊ या ,
गुणवत्तेच्या
गावा जाऊ या !
९ ]ज्ञानरचनावादाशी मैत्री ,
घोकंपट्टीला
कात्री !
१० ]ज्ञानरचनावादाचा सूर आळवू ,
कृतीतून ज्ञान
मिळवू !
११ ]
ज्ञानरचनावादच देईल ,
न्याय प्रत्येक
मुलाला !
१२ ]
ज्ञानरचनावादी आचरण ,
कला कौशल्यांचे
कारण !
१३] रमू ज्ञानरचनावादाच्या अंगी ,
प्रज्ञादिप लावू
जगी !
१४ ]ज्ञानरचनावादाचे पाऊल ,
देई प्रगतीची
चाहूल !
१५ ]
ज्ञानरचनावादाशी जोडू नाळ ,
विद्यार्थ्यांचे
उजळू भाल !
१६ ]
ज्ञानरचनावादाची मात्रा ,
मिटवी
न्यूनगंडाचा खतरा !
१७] झुगारु परावलंबनाची छाया ,
हाचि
ज्ञानरचनावादाचा पाया !
१८ ]
ज्ञानरचनावादाची करणी ,
फुलवी प्रतिभेची
धरणी !
१९ ] जिथे अनुभव
हाच गुरु ,
तिथेच
ज्ञानरचनावाद सुरु !
२० ]
ज्ञानरचनावादाचा घेऊ वसा ,
पुसू अप्रगताचा
ठसा !
२१]ज्ञानरचनावादाची
किमया न्यारी ,
प्रत्येक पंखात
बळ भरी !
22 ] ज्ञानरचनावादी शाळा ,
लावी अभ्यासाचा
लळा !
२३] ज्ञानरचनावादाचे तंत्र वेगळे ,
प्रगत होती सारी
बाळे !
२४] ज्ञानरचनावादाची वाट ,
उगवी प्रगतीची
पहाट !
२५ ]
ज्ञानरचनावादच घडवील ,
प्रगत शैक्षणिक
महाराष्ट्र माझा !
२६)मराठी भाषेला
महत्त्व आहे फार
ज्ञानरचनावादाने लावला शिक्षणाला हातभार .
२७)आपल्या
राज्यात करावा मराठी भाषेचा मान
आ आई, त ताई, ऐका सर्व
देऊन कान.
२८)कोरा कागद, काळी शाई
रोज मला शाळेत जाण्याची घाई.
२९) भाषण करतांना
असावी शब्दाची साठवण
गुणाकार करतांना करावी पाढ्यांची आठवण.
३०) मला
आहे ज्ञानरचनावादी शिक्षणाची आवड
मी
केली ------ सरांची जि.प शाळेची निवड .
३२)मँडम आमची छान शिक्षण देते
मी हसतखेळत
शिक्षण घेते.
३३)जि.प.शाळेत
ज्ञानरचनावादी गजर
विद्यार्थी रोज असतात शाळेत हजर.
३४)द्राक्षेच्या
वेलीवर त्रिकोणी पान
रचनावादी शिक्षणाने राखला शाळेचा मान.
३५)नयनरम्य बागेत
नाचत होता मोर
ज्ञानरचनावादी शिक्षण आले, भाग्य माझे थोर.
३६)वन,टू,थ्री
ज्ञानरचनावादी शिक्षण एकदम फ्री.
३७)हसायचं
खेळायचं सर्व काही करायचं
हसतखेळत शिक्षण घ्यायला कशाला लाजायचं .
३८)शिक्षणाच्या सागरात भाषा -गणिताची जोडी
ज्ञानरचनावादी शिक्षण घेण्याची मला लागली
गोडी.
३९ काळाबरोबर
चालू या !
ज्ञानरचनावादी
होऊ या !!
प्रगत शैक्षणिक
महाराष्ट्र घडवू या !!!
४०)ज्ञानदानाने
करतो मी कर्तव्यपूर्ती
रचनावादी शिक्षणाने मिळाली मला
स्फूर्ती.....
मित्रांनो , प्रत्येक बी मध्ये रुजण्याचं सामर्थ्य असतं .
सारा वृक्ष एका बी त सामावलेला असतो .पण जोपर्यंत ओलसर माती आणि दमट हवामान उपलब्ध
होत नाही , तोपर्यंत बी रुजू शकत
नाही . ती तशीच पडून राहते .हाच न्याय बालकांनाही लागू होतो . प्रत्येक मूल स्वतःच
ज्ञानरचियेता असते . पण त्याला पोषक वातावरण प्राप्त झालं नाही तर त्याची अवस्था न
रुजणाऱ्या बी प्रमाणे होते .
बालकांना
फुलण्यासाठी \ आत्माविष्कारासाठी अनुकूल
\ पूरक परिस्थिती निर्माण करुन देणं म्हणजेच
ज्ञानरचनावाद होय .
सुरक्षित \ बिनधोक वाढण्यासाठी रोपट्यांना जशी कुंपनाची
तशी बालकांना संस्काराची गरज असते , हे ही लक्षात
घेणं महत्त्वाचं आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा